संजय दत्तच्या आयुष्यात एकवेळ अशी होती की, पोटची मुलगी त्रिशाला त्याला काका म्हणून हाक मारायची. त्यावेळी संजयचा पहिली पत्नी ऋचा बरोबर घटस्फोट होणार होता. मुलगी त्यावेळी आईसोबत अमेरिकेत रहायची.
त्रिशाला काका म्हणून हाक मारते, हे संजय दत्तल मान्य नव्हतं. त्याने यावरुन पत्नीसोबत भांडण केलं होतं. मी खूप नाराज होतो. मी ऋचा विचारलेलं. जर, मी उद्या नसेन तर मुलांच्या डोक्यात मला जिवंत ठेवणं ही तुझी जबाबदारी नाही का?
मी ऋचाला म्हणालो, तुझ्याजागी जर मी असतो, परिस्थिती उलट असती, तर तिच्या मनात तुझ्या आठवणी कशा कायम राहतील, हे मी पाहिलं असतं. पण तिने असं केलं नाही.
संजय दत्तने ऋचा शर्माच्या आई-वडिलांवरही निशाणा साधला होता. मला आठवतय ती रुग्णालयात अखेरच्या घटका मोजत होती...
त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी मला विचारलं, त्रिशालाच आता काय होणार?. मी म्हटलं, तिचं काय होणार?. ते म्हणाले त्रिशालाला आम्ही आमच्यासोबत ठेवणार असं संजय दत्तने सांगितलं.