बॉलिवूडच्या संजू बाबाने अर्थात अभिनेता संजय दत्तने नुकतीच कर्करोगावर यशस्वी मात केली आहे.
कर्करोगाचा पराभव केल्यानंतर संजय दत्त आता पूर्णपणे निरोगी दिसत आहे.
उपचारानंतर भारतात परतलेला संजय दत्त सध्या सोशल मीडियावर बराच अॅक्टिव झाला आहे.
संजय दत्तने आता आपला लूकही पूर्णपणे बदलला आहे.
पूर्वीपेक्षा संजय दत्त या नव्या लूकमध्ये अधिक देखणा दिसत आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या नव्या लूकमध्ये संजय दत्तने केसांची शैली पूर्णपणे बदलली आहे. शिवाय हेअर कलर देखील केला आहे.
संजय दत्तचा हा नवीन लूक हेअरस्टायलिस्ट अलीम हकीमने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.