अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नाटकाच्या सध्या ऑस्ट्रेलियात आहे. तिथले काही फोटो संकर्षण सोशल मीडियावर शेअर करत आहे.
कॉफी पिण्याचं बेस्ट ठिकाण!, असं म्हणत संकर्षणने ऑस्ट्रेलियातील सिडनी शरहातील हार्बर ब्रिजजवळचा फोटो शेअर केला आहे.
नियम व अटी लागू या नाटकाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील प्रयोगा दरम्यानचा फोटो संकर्षणने शेअर केला आहे.
कोथरूडला मस्त प्रयोग झाला. प्रयोगानंतर प्रवास करत मुंबई विमानतळावर आलोय. आता ऑस्ट्रेलियाला निघालोय, असं म्हणत संकर्षणने हा फोटो शेअर केला होता.
नियम व अटी लागू या नाटकात अभिनेत्री अमृता देशमुखदेखील आहे. तिनेही ऑस्ट्रेलियातील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. “Don’t worry about the world ending today. It’s already tomorrow in Australia”, असं कॅप्शन देत अमृता देशमुखने फोटो शेअर केले आहेत.