वाल्मिक कराडवर मकोका; समर्थक आक्रमक, सर्वत्र शुकशुकाट, परळी बंद,पहिले photos
मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून, परळीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
Follow us
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेला आता एक महिना उलटून गेला आहे. प्रकरण चांगलंच तापलं आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती.
वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून सुरू होती.
वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी सोमवारी मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते.
दरम्यान जर वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई नाही झाली तर आत्मदहन करू असा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थानी दिला होता.
त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
वाल्मिक कराडवर कारवाई करण्यात आल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं असून, परळीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. परळीमधील सर्व दुकानं बंद करण्यात आली आहेत.