बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चाहत्यांमध्ये तिच्या अभिनय आणि फॅशन लूकसाठी ओळखली जाते.अनेकदा तिच्या प्रत्येक लूकला फॉलो करतात. साराने अलीकडेच तिचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सारा अली खान एका मोठ्या सोफ्यावर बसून किलर पोज देताना दिसत आहे, तिच्या या फोटोना चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.
या फोटोमध्ये सारा अली खानने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसवर बीन कलरचे जॅकेट घातलेले दिसत आहे, जे तिच्यावर र खूपच सूट होत आहे.
फोटोमध्ये साराने तिच्या केसांना हलका कर्ल लुक दिला असून केस मोकळे सोडले आहेत. यासोबतच तिने न्यूड मेकअपसह केला आहे.
व्यासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास सारा अली खानने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे .