बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. नुकतंच साराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती फारच सुंदर दिसत आहे.
लॉकडाऊननंतर अनेक बॉलिवूड कलाकार मालदीवला हजेरी लावली होती. त्यानंतर आता साराही सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे.
दरम्यान नुकतंच सारा अली खान कुली नंबर वन या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता.
‘Sandy Toes & Sunkissed Nose’, असे कॅप्शन लिहित तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत तिने बिकनी आणि स्कर्ट घातला आहे.