‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका रंजक वळणावर; मेघनाचा डाव यशस्वी होणार का?
सारं काही तिच्यासाठी' मालिकेत काही दिवसांपूर्वीच निशी-नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला. लग्नानंतर निशी तिच्या नव्या आयुष्यात रमण्याचा प्रयत्न करतेय. तर दुसरीकडे मेघनाने तिचा डाव खेळण्यास सुरुवात केली.
1 / 5
'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत निशी आपल्या नवीन आयुष्यात रमायचा प्रयत्न करतेय. तर दुसरीकडे मेघनाचा चांगुलपणाचा रंग उतरायला सुरुवात झाली आहे.
2 / 5
ती स्वतःशी गाठ बांधते की निशीने काहीही केलं तरी मी तिला मनापासून कधीच सून म्हणून स्वीकारणार नाही. मेघना फक्त नीराजच्या हट्टापायी हे लग्न करून देते.
3 / 5
मुंबईला जाण्याआधी ही मेघनाने निशीचा काटा काढण्याची पूर्ण तयारी केली पण ओवीमुळे तिचा प्लान फसतो. पण आता ती हे अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करणार आहे.
4 / 5
नीरज परत येईपर्यंत ती निशिची घरातून आणि नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्नात असणार आहे. ज्याची सुरुवात मेघनाने हुशारीने सुरु केली आहे. निशी ओवीची काळजी घ्यायला जास्तीत जास्त वेळ खोत घरात असते ज्याचा राग मेघनाला आहे.
5 / 5
मेघना, निशीला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात यशस्वी होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.