गायिका जुईली जोगळेकर आणि गायक रोहित राऊत लग्न करणार असल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Follow us on
रोहित आणि जुईली मागच्या 3-4 दिवसांपासून काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दररोज दोघांचा एकत्र एक फोटो ते शेअर करत आहेत. आणि त्यासोबत ‘काऊटडाऊन’ देत आहेत. त्यामुळे हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा होतेय.
झी मराठीवरच्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. याच कार्यक्रमात जुईलीदेखील होती. तिथे या दोघांची ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री बहरत गेली.
पुढे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्याची कबुली त्यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांची जोडी अनेकांना आवडते. हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
आता जुईली आणि रोहित शेअर करत असलेल्या फोटोंवरून त्यांचं लग्न २३ जानेवारीला होईल असा अंदाज लावण्यात येतोय.