PHOTO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट पराक्रमाची साक्ष, पोलीस दाम्पत्याकडून प्रतापगडाची हुबेहूब प्रतिकृती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडाची हुबेहुब प्रतिकृती सिंधुदुर्गातील एका पोलीस दामपत्याने साकारली आहे. (Pratapgad Fort Replica by Police Couple)
Follow us
शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे आठवावे रूप, असे वर्णन साताऱ्यातील प्रतापगडाचे केले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडाची हुबेहुब प्रतिकृती सिंधुदुर्गातील एका पोलीस दामपत्याने साकारली आहे.
दिवाळी सणाला लहान मुले, हौशी तरूण वर्ग विविध प्रकारचे गड-किल्ले बनवितात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांपैकी एक अशी प्रतापगडाची ओळख आहे.
सावंतवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर आणि त्यांच्या पत्नी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव बाबर यांनी हा किल्ला साकारला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून मिळेल त्या वेळेत त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने प्रतापगड साकारला आहे.
बाबर यांनी कामाचा ताण बाजूला ठेवून महारांजाबद्दल असलेल्या आदर आणि प्रेमापोटी एवढा मोठा अगदी हुबेहूब प्रतापगड किल्ला साकारला आहे.
विशेष म्हणजे महारांजाचा प्रतापगडावरील पराक्रम बाबर यांचा तोंडपाठ आहे.
तसेच प्रतापगडावरील सर्व महत्त्वांच्या जागा, त्यांचा इतिहासही त्यांना माहिती आहे.
यामुळे अण्णासाहेब बाबर आणि त्यांच्या कुटुंबियांना महाराजांच्या प्रती असलेला आदर आणि प्रेम वाखाणण्याजोगे आहे.