मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.
‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सायली आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना नेहमी अपडेट देत असते.
याव्यतिरिक्त अनेक चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून सायलीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
आता सायलीनं हे सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअऱ केले आहेत. या फोटोमध्ये सायली अतिशय सुंदर आणि सोज्वळ दिसतेय.
सध्या सायली ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतून शर्वरीच्या रुपात चाहत्यांशी कनेक्ट होतेय.