Chandan Roy Sanyal: बहूचर्चित ‘आश्रम’ वेब सीरीजचा सिझन -3 आला, पण कोण आहे भोपा स्वामी ; जाणून घ्या फोटो स्टोरीतून
बॉलिवूडमध्ये चंदन रॉयने 'रंग दे बसंती' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच छोटी होती. यानंतर ती शाहिद कपूरसोबत विशाल भारद्वाजच्या 'कमिने' या चित्रपटातही भूमिका केली होती. 2009 मध्ये आलेल्या या चित्रपटात चंदनने त्याच्या सहाय्यक भूमिकेने प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.

Chandan Roy SanyalImage Credit source: Instagram
- बॉबी देओलची भूमिका असलेली आश्रम वेब सीरीजचा सिझन -३ आला आहे. 2020 मध्ये सुरू झालेली ही वेबसिरीज पहिल्याच सीझनपासून धुमाकूळ करत आहे. या मालिकेत बॉबी देओल बाबा निरालाच्या भूमिकेत आहे.त्याच्यासोबत भोपा स्वामीची भूमिका साकारणारा चंदन रॉय सन्यालही रसिकांच्या पसंतीस उतरला आहे.
- यामध्ये वेबसिरीज भोपा स्वामींचे पात्र हे अतिशय हुशार आणि गुंडांचे काम करताना दाखवाण्यात आले आहे. भोपा स्वामी हे बाबा निराला यांच्या काळ्या कृत्यांमध्ये साथ देत असतो. चंदन रॉयने ही व्यक्तिरेखा जबरदस्त वठवली आहे. ‘जपनम’ कॅचफ्रेज भोपा स्वामीच्या पात्रावरून देखील आला आहे.
- चंदन रॉय सन्याल हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आहे. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1980 रोजी दिल्लीत झाला. चंदन बंगाली कुटुंबातून आला असून त्याने दिल्लीच्या झाकीर हुसेन कॉलेजमधून गणितात पदवी घेतली आहे.
- बॉलिवूडमध्ये चंदन रॉयने ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच छोटी होती. यानंतर ती शाहिद कपूरसोबत विशाल भारद्वाजच्या ‘कमिने’ या चित्रपटातही भूमिका केली होती. 2009 मध्ये आलेल्या या चित्रपटात चंदनने त्याच्या सहाय्यक भूमिकेने प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.
- त्याने 2010 मध्ये बंगालीमध्ये पदार्पण केले. महानगर@कोलकाता हा त्यांचा पहिला चित्रपट होता. अपराजिता तुमी या चित्रपटातून त्यांना बंगाली चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. त्यानंतर त्याला रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्राग नाम मध्ये दिसून आले.
- तेव्हापासून चंदन जज्बा, जब हॅरी मेट सेजल, शेफ, बंगिस्तान, जबरिया जोडी आणि सुनक या चित्रपटांमध्ये दिसला आहे. याशिवाय त्याने , भ्रम, निषिद्ध प्रेम, मैं हीरो बोल रहा हूँ या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.
- मात्र आश्रम वेबसिरीजमधून चंदनला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. भोपास्वामीचे पात्रामुळे या आपल्या पात्राला इतकं प्रेम मिळेल असं चंदनला वाटलं नव्हतं. आज चंदन रॉय सन्याल हे हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नाव बनले आहे.