ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 ची रुंदी मेगा ब्लॉकमध्ये कशी वाढली पाहा ? सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध

ऐतिहासिक ठाणे स्थानकात मध्य रेल्वे आणि ठाणे ते पनवेल-वाशी ट्रान्सहार्बर मार्ग एकत्र येत असल्याने येथील ( फूटफॉल ) रोजची प्रवासी संख्या तब्बल सहा लाख इतकी आहे. त्यामुळे ठाणे स्थानकाला मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हटले जाते. या स्थानकातील जलद लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांचा थांबा असणाऱ्या फलाट क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी वाढविण्यासाठी मध्य रेल्वेने 63 तासांचा मेगाब्लॉक गुरुवारी रात्रीपासून घेतला असून तो रविवारी दुपारी संपणार आहे.

| Updated on: Jun 01, 2024 | 3:39 PM
मध्य रेल्वेवरील ठाणे हे महत्त्वाचे जंक्शन आहे. यामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेस फेर्‍यांची वाहतूक स्थानकातून मोठ्या प्रमाणात होते. ठाणे स्थानकात ठाणे ते पनवेल-वाशी हा ट्रान्सहार्बर मार्ग देखील एकत्र येत असल्याने ठाणे स्थानकाची रोजची प्रवासी संख्या 2017 -18 च्या आकडेवारीनूसार चार लाख 15 हजार 765 इतकी आहे. त्यामुळे ठाणे स्थानकातील जलद गाड्या सुटणाऱ्या फलाट क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी 2 ते 3 मीटरने वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला.

1 / 5
मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहाची रुंदी वाढविण्यासाठी 63 तासांचा मेगाब्लॉक गुरुवार दि. 30 मे रोजी रात्री 12.30 वाजता सुरु झाला. या मेगाब्लॉकमध्ये फलाट क्रमांक पाचची रुंदी वाढविण्यासाठी सिमेंटचे आरसीसी रेडीमेड ब्लॉकचा वापर झाला.

2 / 5
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5 चे रुंदीकरण करण्यासाठी मालगाडीतील रेडीमेड आरसीसीचे सिमेंटचे ब्लॉक आणण्यात आले. त्याआधी रेल्वेचे रूळ जेसीबीच्या सहाय्याने हलविण्याचे महत्वाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या सुमारे सहाशे अधिकारी आणि कर्मचारी तसेच मजूरांनी जेसीबी आणि इतर सामुग्रीच्या साहाय्याने अवघ्या आठ तासांत रेल्वेचे रूळ सरकविले त्यानंतर फलाटाची रुंदी वाढविण्याचे काम सुरु झाले.

3 / 5
ठाण्यातील जलद गाड्या थांबणाऱ्या फलाट क्रमांक पाचवर आरसीसीच्या 750 सिमेंट ब्लॉक वापरण्यात येणार आहेत. शनिवारी सायंकाळी हे महत्वाचे काम पूर्ण करण्यात आले. रविवारी शेवटच्या टप्प्यातील काम सुरू होईल. सिमेंटच्या ब्लॉकमधील गॅप सिमेंटने भरण्यात येईल. त्यानंतर हा फलाट सोमवारी प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

4 / 5
मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 6 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक 5 आणि 6 येथे जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यात येतो. तसेच लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील येथे थांबतात. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते. अनेकदा गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरीची देखील परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी पदभार स्वीकारताच ठाणे स्थानक आणि दादर स्थानकाला भेट देऊन पाहणी केली होती.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.