जगातून नष्ट होण्याच्या वाटेवर असलेले हे 6 आगळे प्राणी भारतात पाहायला मिळतात…

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. तसेच भारत विविध नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या असंख्य दुर्मिळ प्रजातींचे घर देखील आहे. वन्यजीवांचे हे वैविध्य पर्यटक आणि निसर्गप्रेमींना नेहमी आकर्षित करीत असते. तथापि, यापैकी बऱ्याच प्राण्यांना वाढते शहरीकरण आणि शिकारीमुळे गंभीर संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यांची लोकसंख्या धोकादायकपणे कमी होत चालली आहे. वेळीच उपाय केले नाहीत तर हे प्राणी पृथ्वीवरुनच कायमचे नष्ट होणार आहेत. भारतातील सहा धोक्यात असलेल्या प्रजातींना नष्ट होण्यापूर्वी तुम्ही पाहून घ्यायला हवे अन्यथा हे प्राणी केवळ चित्रातच पाहण्याची वेळ पुढच्या पिढीवर येईल ...

| Updated on: Jul 16, 2024 | 9:06 PM
1 - लायन टेल मकाक्यू  (Lion-tailed Macaque)- हे जगातील सर्वात धोक्यात असलेल्या प्राण्यापैकी एक आहेत. जगात ही माकडे अंदाजे 2,500 शिल्लक राहीली आहेत. या माकडांच्या माने भोवताळच्या वैशिष्ट्यपूर्ण लांब काळ्या केसांमुळे आणि शेपटीमुळे त्याला लायन टेल मकाक्यू माकड म्हटले जात असते. ही माकडे सर्वभक्षी असतात त्यांना आहारात फळे, कीटक आणि लहान प्राणी देखील ते खातात.लहान-लहान गटात ते सामाजिकपणे मिसळून एकत्र राहतात. भरमसाठ जंगलतोड आणि शेतीमुळे यांच्या अधिवासाचे नुकसान झाल्याने त्यांच्या अस्तित्वासाठी धोका निर्माण झाला आहे. या माकडांसाठी संरक्षित वने तयार न केल्यास ते केवळ चित्रात पाहण्याची वेळ लवकरच येईल असे म्हटले जात आहे.

1 / 5
2 - ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच 'माळढोक' ( Ardeotis nigriceps ) हे भारतात केवळ 100-250 उरले आहेत.हा राजस्थानचा राज्य पक्षी आहे. या पक्षाचे वजन तब्बल 15 ते 18 किलो असते. त्यांची उंची (3.3 फूट ) 1 मीटर असते,पखांची सहीत लांबी 210 ते 250 असते. जंगलाला लागणारे वणवे,चराऊ कुरणे नष्ट होणे, वीजेचे मनोरे आणि वीज वाहिन्याचे वाढते जाळे, पवन चक्क्या म्हणजेच थोडक्यात शहरीकरणामुळे पक्ष्यांची ही जमात नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. हे पक्षी मुख्यत: राजस्थानात आढळतात गुजरात, महाराष्ट्र ,मध्य प्रदेश आणि कर्नाटकात तुरळक प्रमाणात शिल्लक आहेत. या पक्षातील नराने काढलेला विशिष्ट प्रकारचा आवाज 500 मीटर्सहून देखील ऐकायला येतो. हाराष्ट्रात हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजे सोलापूर, अहमदनगर, नागपूर आणि बीड जिल्ह्यात आढळतो.सोलापूरजवळ नान्नज अभयारण्य येथे या पक्ष्यासाठी संरक्षित अभयारण्य स्थापन केले आहे.हे महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठे अभयारण्य आहे.

2 / 5
3 - Blackbuck काळवीट - काळवीट ( Indian Antelope) किंवा भारतीय मृग ही हरिणाची एक जात आहे. काळवीटाचे  प्रमाण शिकार आणि त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे कमी झाले आहे. त्यांची संख्या 1947 मध्ये सुमारे 80,000 होती, आता ती 8,000 पर्यंत घसरली आहे.काळवीटाच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना भटके कुत्रे,शेतीसाठी कीटकनाशकांचा वाढता वापर आणि वाहनांच्या वाढत्या संख्येने त्यांच्या  जीवाला धोका निर्माण झाला आहे.काळवीट हा प्राणी भारत,नेपाळ आणि पाकिस्तानात आढळतो.

3 / 5
4 - हिम बिबट्या - ( Snow Leopard )- हिम बिबट्या भारतासह मध्य आणि दक्षिण आशियातील पर्वतीय प्रदेशात राहतो.थंड हवामानात देखील तो टिकून राहण्याच्या क्षमतेमुळे त्यांना स्नो लेपर्ड म्हणून ओळखले जाते. मा शिकार आणि अधिवास नष्ट होण्याच्या धोक्यांचा सामना करावा लागतो. संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये त्याच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे समाविष्ट आहे.

4 / 5
5 - लाल पांडा ( Red Panda ) - लाल पांडा किंवा लाल अस्वल किंवा मांजर म्हणूनही त्याचे नाव पडले आहे.हा पूर्व हिमालय आणि नैऋत्य चीनमध्ये आढळणारा एक लहान अर्बोरियल सस्तन प्राणी आहे.भारतात हा प्राणी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आढळतो.लाल पांडा हे दुर्मिळ असून ते  समशीतोष्ण जंगलात 2,200 ते 4,800 मीटर उंचीवर राहतात आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची त्वचा जाड असून त्यावर फर असते. प्रामुख्याने बांबू,फळे,बेरी आणि कीटक ते खातात. वाढत्या शहरीकरण आणि शिकारीने त्यांचा अधिवास नष्ट झाला आहे.त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरु आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.