‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ‘वहिनीसाहेब’ अशी ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच आई बनणार आहे. त्यामुळे आता ती स्वत:ला वेळ देणं जास्त पसंत करतेय.
आता ती मस्त वेळ काढत पार्लरमध्ये पोहोचली आहे.
तिनं हे पार्लरमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती मस्त आराम करताना दिसत आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा, नताशा आणि अनिता हसनंदानीप्रमाणे धनश्रीनंसुद्धा पोल्का डॉट ड्रेसेसद्वारे प्रेग्नंसीची बातमी चाहत्यांना दिली होती. ती गेले अनेक दिवस सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.