त्यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे.
गेले काही महिने आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.
वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आलं आहे.
शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या.
२००३मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतल्यानंतर आनंदवनातच काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.