आपल्या कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत आहे.
' थप्पड', 'बदला', 'पिंक', ' सांड की आंख','नाम शबाना' अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती 'रश्मी रॉकेट' या सिनेमासह सज्ज झाली आहे.
गेले अनेक दिवस या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये तापसी व्यस्त आहे.
तिचा हा उंट सफारी करतानाचा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
तापसी चित्रीकरणादरम्यान धमालसुद्धा करतेय. तिनं आता या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमधील तापसीचा लूक चाहत्यांचं मन जिंकतोय. या फोटोमध्ये ती हटके अंदाजात दिसली.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तापसी नवनवीन जागेवरसुद्धा फिरली आहे. या भटकंतीचे फोटोसुद्धा तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.