कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दोन सामन्यांना मुकलेल्या शमीने चांगली कामगिरी केली. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा सुद्धा अधिक खूष आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा त्रिफाळा उडविल्यानंतर टीम इंडियाने मैदानात आनंद साजरा केला.
जसप्रीत बुमराह पाठ दुखीमुळे टीम इंडियात नाही, परंतु त्याची जागा कोण भरुन काढेल अशी सगळ्यांना चिंता होती. परंतु शमी त्याची जागा भरून काढेल अशी चाहत्यांना आणि टीमला खात्री झाली आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. त्यावेळी रोहित शर्माने विश्वसाने शमीच्या हाती चेंडू दिला. सुरुवातीच्या दोन चेंडूवर 4 धावा गेल्या, परंतु नंतर चेंडूवर 4 विकेट घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कालच्या सामन्यात मोहम्मद शमीने चांगली कामगिरी केल्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये चार विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिल्याने टीममध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे.