'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.
आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धुमाकूळ घालत आहेत.
आता साडीमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे. या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
रसिकानं मधे काही काळ 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून एक्झिट घेतली होती. मात्र काही काळानंतर आता ती परत मालिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
रसिकाला तिच्या मालिकेतील नावानं म्हणजेच 'शनाया' या नावानं जास्त ओळखलं जातं.