अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणजेच महाराष्ट्राची लाडकी शेवंतानं नुकतंच आईसोबत काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिचं आणि तिच्या आईचं असलेलं प्रेम झळकत आहे.
मालिका विश्वात पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे आगमन होत आहे. याच निमित्ताने मालिकेतील ‘अण्णा’, ‘शेवंता’ आणि ‘माई’ ही मुख्य पात्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
अपूर्वा ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा साकारत होती. मात्र, अचानक तिने ही मालिका सोडल्याने तिच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.