IPL 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला शिखर धवन IPL खेळणार की नाही? जाणून घ्या

टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेले अनेक दिवस टीममधून जागा गमावलेला शिखर परत काही कमबॅक करू शकला नाही. शिखर याने निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र चाहत्यांना प्रश्न पडला आहे की तो आयपीएस खेळणार की नाही? जाणून घ्या.

| Updated on: Aug 24, 2024 | 7:51 PM
1 / 5
गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून शिखरला गौरवण्यात आलं होतं. टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर राहिला होता. शिखर धवन याने सर्वाधिक 363 धावा केल्या होत्या.

2 / 5
शिखर धवन याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या निवृत्तीबद्दल माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये शिखरने तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही यासंदर्भातही त्याने माहिती दिली आहे.

3 / 5
या व्हिडीओमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह घरगुती क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं. आयपीएल ही घरगुती टूर्नामेंट असून आयसीसीकडूनही तशी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये शिखर धवन आपल्याला पाहायला मिळणार नाही.

4 / 5
शिखरच्या निवृत्तीनंतर पंजाब किंग्सनेही पोस्ट करत, हॅप्पी रिटायरमेंट, आम्ही सगळे तुझ्या आयुष्यातील पुढील खेळी पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

5 / 5
शिखर धवन आयपीएलमध्ये 5 संघांसाठी खेळला आहे. 2008 मध्ये दिल्ली कॅपिटल्स,  मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाबसाठी शेवटची आयपीएल खेळला आहे. आयपीएलमध्ये 222 सामन्यांच्या 221 डावांमध्ये फलंदाजी करताना 35.07 च्या सरासरीने 6768 धावा केल्यात. यामध्ये 2 शतके आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे.