बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरनं लॉकडाऊनमध्ये बॉडी ट्रान्सफॉर्म केली आहे. नेहमीच फिट राहणाऱ्या अनिल कपूरनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो शर्टलेस दिसतोय.
या फोटोसोबत त्यानं लांबलचक पोस्टही लिहिली आहे. त्यात जेवण हा आपला विक पॉईंट आहे आणि आपल्याला खूप खायला लागतं. मात्र लॉकडाऊनच्या काळात स्वत:च्या सवयींमध्ये बदल केले असल्याचं तो म्हणाला.
'मी प्रयत्न करतो आणि मी लढतो, बऱ्याचदा मी हारतो. मात्र कुठलीच गोष्ट कठिण नाही', असंही त्यानं म्हटलं आहे.
अभिनेता अनिल कपूरच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होते.
तो दररोज नित्यनियमानं वर्कआऊट करतो आणि नेहमीच वर्कआऊट सेशनचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.