महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे .या बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात कोथरुडमध्ये शिवसेनेचे जोडो मारो आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी कोथरूडमधील कर्वे पुतळ्याच्या जवळ एकनाथ शिंदेसह त्यांच्या सोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडेमारत आंदोलन केले.
शिवसैनिक आंदोलकांनी यांना जोडेच नाही, तर सापडल्यावर मारणार देखील आहोत, असा संताप व्यक्त करत बंडखोर आमदारांच्यावर टीका केली आहे.
शिवसैनिक आंदोलकांनी यांना जोडेच नाही, तर सापडल्यावर मारणार देखील आहोत, असा संताप व्यक्त करत बंडखोर आमदारांच्यावर टीका केली आहे.
दुसरीकडं मुंबईतही शिवसेनेच्या समर्थनात बाईक रॅली काढण्यात आली होती, यामध्येही मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही केले .