आदेश… आणि डरकाळी… शिवसेनेच्या या गोष्टी माहीत आहे का ?

आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन. 1966 रोजी शिवसेनची स्थापना झाली. मराठी लोकांची संघटना म्हणून उदयाला आलेल्या या पक्षाचा राजकीय प्रवास कसा होता, 58 वर्षांत शिवसेनेनं कोणती वादळं झेलली? हे जाणून घेऊया.

| Updated on: Jun 19, 2024 | 10:21 AM
आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आहे. 19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मराठी लोकांनी या 'संघटना' म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचं सदस्यत्व मिळावं यासाठी धडपड सुरू केली. सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा करण्यात आली. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या घरातील लोकांच्या व निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने शिवसेना उद्घाटनाचा सोहळा पार पडला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा उद्घोष करीत शिवसेना स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली.  शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी विजया दशमीच्या दिवशी झाला.

1 / 7
शिवसेनेने 1967 साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या.शिवसेना शाखांकडे आपले प्रश्न सोडवण्याचे एक व्यासपीठ म्हणून लोक पाहू लागले .सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला १९७१ साल उजाडलं.

2 / 7
आदेश… आणि डरकाळी… शिवसेनेच्या या गोष्टी माहीत आहे का ?

3 / 7
2003 साली महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली.  तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांनी याच अधिवेशनात एक महत्वाचा ठराव मांडला. शिवसेनाप्रमुख यांना असलेल्या अधिकारानुसार उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेण्यात यावे. तसेच, त्यांची नियुक्ती कार्याध्यक्ष म्हणून करावी असा हा ठराव होता. हा ठराव मंजूर करण्यात आला आणि अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्षाची धुरा आली. त्यानंतर पुढच्याच वर्षी नारायण राणे यांनी तर 2005 साली राज ठाकरे यांनी पक्ष सोडला.

4 / 7
2010 साली दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवा सेनेची घोषणा केली. नातू आदित्य ठाकरे याच्याकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवीट असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यावेळी ‘उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या. असे भावूक उद्गार त्यांनी काढले होते.

5 / 7
आदित्य ठाकरे यांची युवासेना प्रमुख नियुक्ती केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात शिवसेनाप्रमुख पद हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणारा अशी चर्चा होती. परंतु, उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख हे पद रिक्तच राहिल असे जाहीर केले. त्यानंतर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेमध्ये पक्षप्रमुख हे नवे पद निर्माण करण्यात आले आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिवसेनापक्षप्रमुख म्हणून तसेच सामनाचे संपादक म्हणून त्यांनी कामास सुरूवात केली.

6 / 7
58 वर्षे झालेल्या या शिवसेना पक्षात शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना ही षण्मुखानंद हॉलमध्ये वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना ही वरळीतील डोंम या ठिकाणी आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे.

7 / 7
Follow us
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.