आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानमधील दुसरा हायव्होल्टेज सामना रविवारी पार पडणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये झालेल्या चुका टाळत नव्या उमेदीने मैदानात उतरणार आहे. या सामन्यआधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठं वक्तव्य केलं आहे.
गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाची प्लेइंग 11 निश्चित नाही. त्यामुळे संघ स्थिर दिसत नाही. कारण संघाचे प्रमुख चार फलंदाज हेसुद्धा माहित नाहीआणि पाचव्या क्रमांकावर कोण खेळेल हेसुद्धा काही नक्की नाही, असं शोएब अख्तर याने म्हटलं आहे.
स्पिनर युजवेंद्र चहल याला संघात का जागा मिळाली नाही ही गोष्ट मला अजुनही समजली नाही, असं म्हणत अख्तर याने चहलला टीममध्ये जागा न मिळण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टीम इंडियाला एका गोलंदाजाची कमी जाणवणार असल्याचं अख्तर याने म्हटलं आहे. आशिया कपनंतर वर्ल्ड कपसारखी मोठी टूर्नामेंट आहे. सर्व संघ जोरदार तयारी करत असताना दिसत आहेत.
टीम इंडियाचा दुसरा सामना रविवारी होणार असून सामन्यावर पावसाचं संकट असणार आहे. पहिला सामनाही पावासमुळे रद्द झाला होता.