कुनो नॅशनल पार्कमध्ये ‘शौर्य’ चित्त्याचा मृत्यू, पोस्ट मॉर्टमनंतर खरं कारण येणार पुढे

| Updated on: Jan 16, 2024 | 7:44 PM

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. नामिबियाहून आणलेल्या चित्ता 'शौर्या'चा दुपारी मृत्यू झाला. चित्ता बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. पण उपचारादरम्यान शौर्यचा मृत्यू झाला.

1 / 6
मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या चित्त्याचे नाव 'शौर्य' होते. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोस्टमॉर्टम केले जात आहे.

2 / 6
सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून आठ चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर 2023 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले गेले. असे एकूण 20 चित्ते आणले होते. त्यापैकी 10 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.

3 / 6
कुनोमध्ये चित्ताच्या मृत्यूची शेवटची बातमी 2 ऑगस्ट 2023 रोजी आली होती. आता सहा महिन्यांनंतर ही वाईट बातमी आली आहे.

4 / 6
नामिबियाहून आलेला हा चित्ता मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास बेशुद्धावस्थेत आढळून आला. पथकाने तात्काळ घटनास्थळी त्याच्यावर उपचार सुरु केले. चित्ता शुद्धीवरही आला पण तो खूपच अशक्त होता.

5 / 6
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला तातडीचे उपचार देण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण अखेर त्याने त्या उपचारांना प्रतिसाद देणं सोडून दिलं. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरं कारण समोर येईल.

6 / 6
कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्याच्या मृत्यूनंतर संख्या 14 वर आली आहे. यात चार पिल्लांचा समावेश आहे. तीन आठवड्यांपूर्वी नामिबियातून आणलेल्या मादीने तीन पिल्लांना जन्म दिला होता. याआधी मार्च 2023 मध्येही चार पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील तिघांचा काही महिन्यांतच मृत्यू झाला होता.