Marathi News Photo gallery Shri vitthal rukmini mandir pandharpur decorate by 25 lakh basil tulsi leaves for celebrating navratri
PHOTO : 25 लाख तुळशीच्या पानांनी सजलं पंढरपुरातील विठ्ठल मंदिर
घटस्थापनेच्या निमित्ताने राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला (vitthal mandir pandharpur) तुळशीच्या पानांनी सजावट करण्यात आली आहे.
Follow us
घटस्थापनेच्या निमित्ताने राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तुळशीच्या पानांनी सजावट करण्यात आली आहे.
पुण्यातील विठ्ठ भक्त असलेल्या राम जांभूळकर यांनी स्वखर्चाने ही सजावट केली आहे.
यासाठी 25 लाख तुळशीची पानं आणि 11 हजार विविध रंगीबेरंगी गुलाबांच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.
मुख्य गाभारा, चौखांभी मंडप, सोळखांभी मंडप, हे सर्व तुळशीच्या पानांसह फुलांनी सजवल्याने विठ्ठल मंदिराला तुळशी वृंदावनाचे स्वरुप आले आहे.
तुळशीच्या सजावटीतील हे रुप डोळ्यात साठवण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.