लग्न होणार म्हटल्यावर आता मित्र परिवारात केळवणाची घाई सुरू झालीये.
लग्न म्हटलं की केळवणापासून कार्यक्रमांना सुरुवात होते. तर या दोघांसाठी पहिलं केळवण ठेवलं ते म्हणजे ईशा केसकरनं.
सिद्धार्थ आणि मितालीनं या केळवणाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गेले 3 वर्ष सिद्धार्थ आणि मिताली एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये त्यांचा साकरपुडा पार पडला.
सिद्धार्थ आणि मितालीची ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते, तसेच या जोडीची कायम चर्चासुद्धा असते.