आज सकाळी-सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा डिंगणे रस्त्यावर गवारेड्यांचा मोठा कळप रस्त्यावर आल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली.
15 हुन अधिक गवारेडे रस्त्यावर ठाण मांडून होते.
तब्बल अर्ध्या तासानंतर हा कळप लगतच्या काजू बागेत शिरला आणि रस्ता मोकळा झाला.
दिवसा ढवळ्या गव्यांचा मुक्त संचार असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.यापूर्वी ही बांदा परिसरात असाच गव्यांचा कळप निदर्शनास आला होता.
काजू हंगाम सुरू होणार असल्याने गव्यांच्या बिनधास्त फिरण्यामुळे शेतकरी सुध्दा भयभीत झाले आहेत.या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.