सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींनी रात्री मोर्ले गावात धूडगूस घातला आहे.
हत्तींनी माड मुळासकट उलटून टाकले, त्याचबरोबर केळीच्या बागा उद्ध्वस्त केल्या आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हत्ती पाळये, मोर्ले परिसरात आपला तळ ठोकून आहेत.
गेल्याच आठवड्यात पाळये गावातील शेतकऱ्यांच्या सुपारी, केळी बागायती मध्ये धुडगूस घालत मोठे नुकसान केले होते.
रात्री हे रानटी हत्ती मोर्ले येथे दाखल झाले. शेतकऱ्यांच्या केळींचा फडशा पाडला.
मोठे माड उपटून टाकले आहेत. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी शेतकरी करीत आहेत.