Eco friendly Ganesh Idol: गायक राहुल देशपांडेच्या रेणुकाने साकारली इको-फ्रेंडली बाप्पाची मूर्ती
कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा सर्व सण उत्साहात साजरे होत आहेत . यंदा गणपती उत्सवही उत्साहात साजरा करण्यावर भर दिला जातोय. यासाठी बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु आहे.
1 / 5
गायक राहुल देशपांडे यांची कन्या रेणुकाचे गाण्याचे, मस्ती करतानाचे वव्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होताना दिसून येतात.नुकतीच रेणुकाने आई- व वडिलांच्या सोबत या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याच्या उपक्रमात सहभागी झालेली दिसून आली.
2 / 5
राहुल देशपांडे यांनी पत्नी व मुली सोबत इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. यासोबत त्यांनी एकी पोस्टही लिहिली आहे.
3 / 5
पुणे हँडमेड पेपर्स, आर्ट पुणे फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्यावतीनं 'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' उपक्रम राबवण्यात आला होता . यामध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भरदिला जातो.
4 / 5
रेणुकाने या उपक्रमात स्वतःच्या हाताने इको-फ्रेंडली बाप्पाची छोटी मूर्ती साकारत मूर्तीला रंग दिला आहे.
5 / 5
या उपक्रमात त्यांच्यासोबत शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. या उपक्रमात बनवण्यात आलेल्या बाप्पाच्या मूर्ती 80% कापूस-कागदाचा लगदा आणि 20% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केल्या जातात. महत्वाचे म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेला कागद हा वृक्षतोड करून तयार केलेला नसून, वापरलेल्या कागदाची गुणवत्ता सुधारुन म्हणजेच पेपर रिसायकल करून वापरला आहे