Snowfall Destinations: स्नोफॉल पाहण्यासाठी भारतामधील सर्वोत्तम पाच जागा
अनेकांना पर्यटनाची आवड असते, मात्र बऱ्याचवेळेला पर्यटनासाठी कुठे जायचे असा प्रश्न पडतो. तुम्हाला जर हिल स्टेशनला जायला आवडत असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टॉप हिल स्टेशनची माहिती देणार आहोत. सोबतच तुम्ही या ठिकाणी स्नोफॉलचा देखील आनंद घेऊ शकाल
1 / 5
गुलमर्ग - गुलमर्ग हे भारतातील सर्वोच्च हिमवर्षाव होणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. गुलमर्गमध्ये तुम्ही स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगसारख्या अनेक उपक्रमांचा आनंद घेऊ शकता. तुम्ही येथे बर्फाच्छादित पर्वत, गोठलेल्या तलावांच्या सुंदर दृश्यांचा देखील आनंद घेऊ शकता. पर्यटकांना बघण्यासाठी हे एक उत्तम असे स्थान आहे.
2 / 5
मनाली, हिमाचल प्रदेश - मनाली हे भारतातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन्सपैकी एक आहे. हिम प्रेमींसाठी हे योग्य ठिकाण आहे. हिवाळ्यात बर्फाच्छादित पर्वत खूप सुंदर दिसतात. तुम्ही हिल स्टेशनच्या आसपास ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंगसारख्या अनेक साहसी खेळात सहभागी होऊ शकता.
3 / 5
तवांग, अरुणाचल प्रदेश - जर तुम्ही भारतातील हिमवर्षावासाठी आकर्षक ठिकाण शोधत असाल तर देशाच्या उत्तर-पूर्व भागात जा. येथे तुम्ही बौद्ध वारसा पाहण्यासोबतच अप्रतिम हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकता. तवांग हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.
4 / 5
लडाख : उत्तर भारतातील लडाख हे एक सुंदर असे पर्यटनस्थळ आहे. तुम्ही तुमच्या परिवारासोबत काही दिवस या ठिकाणी राहण्याचा आनंद घेऊ शकता. बर्फाच्छादित पर्वत, वाहणाऱ्या नद्या, जुने मठ आणि प्राचीन तलाव यांचा हा प्रदेश आहे. जसजसा हिवाळा जवळ येतो तसतसा पांढरा शुभ्र बर्फ या ठिकाणचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतो. बर्फवृष्टीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये येथे जाण्याचा विचार करू शकता.
5 / 5
औली, उत्तराखंड - हे एक बर्फाच्छादित वंडर लँड आहे. औली हे एक सुंदर असे हिल स्टेशन असून, ओक आणि देवदार वृक्षांच्या जंगलांनी वेढलेले आहे. तुम्ही याठिकाणी अनेक सहासी खेळांचा आनंद घेऊ शकता.