भारतात हिवाळ्याला सुरुवात झाली असून वातावरणात बदल झाला आहे. बदललेल्या वातावरणामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी वाढली असून बर्फवृष्टी होत आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर परिसरात बर्फवृष्टी झाली असून मंदिराच्या परिसरात बर्फाची चादर पाहायला मिळाली.
केदारनाथ गंगोत्री, यमुनोत्री या सारख्या उचींवरील ठिकाणावर सातत्यानं बर्फ पडत आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये ढगांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. बर्फवृष्टी आणि पावसामुळे तापमानात घट झाली आहे.
हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 12 आणि 13 डिसेंबरला गढवाल क्षेत्रात बर्फवृष्टी आणि वीज कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहराच्या बाजूला झबरवान टेकड्या आहेत. बर्फवृष्टीमुळ झबरवान टेकड्यावर बर्फवृष्टी झाल्यानंतर मनमोहक दृश्य पाहायला मिळाले.
श्रीनगरमधये बर्फवृष्टी झाली असून शहराचे तापमान 3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहराचे हवाई चित्र, शहरात बर्फवृष्टी झाली असून तापमानातही घट झालेली पाहायला मिळाली.