सध्या सर्वत्र सणांचा माहौल सुरू आहे. या माहौलात मनोरंजनसृष्टीच्या ‘अप्सरे’ने अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने सर्वांना मोहित केले आहे.
सणांच्या पार्श्वभूमीवर सोनालीने ‘एथनिक’ ड्रेसमध्ये छानसे फोटोशूट केले आहे.
वेस्टर्न कपड्यांप्रमाणेच सोनाली या ड्रेसमध्येही सुंदर दिसत आहे.
सोनालीच्या या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
गुलाबी आणि मोती रंगाच्या या ड्रेसमध्ये सोनालीचे सौंदर्य आणखी खुलले आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी सोनाली नेहमीच स्वतःचे छान छान फोटो शेअर करत असते.