अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नवनवीन फोटोशूटसह चाहत्यांच्या भेटीला येते.
तिचे फोटोशूट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. आतासुद्धा तिनं काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
आकाशी रंगाच्या या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
मात्र हे फोटोशूट करण्यामागे एक वेगळं कारण आहे. ते म्हणजे सोनालीनं इन्स्टाग्रामवर 1.7 मिलीअन फॉलोअर्सचा टप्पा क्रॉस केला आहे.