मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांचं मन जिंकते. तिच्या फोटोला चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतो.
अशा सोनालीनं आहे काही थ्रोबॅक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
साडी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली आणि लग्नाचा मंडप.. असा हा फोटो बघून सोनालीचे चाहते घायाळ झाले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे कुणाचा गैरसमज होऊ नये यासाठी तिनं हे रिल लाईफ म्हणजेत शुटिंगचा भाग असल्याचं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.हे रिल लाईफ लग्न आहे अजून रिअल लाईफ लग्न व्हायचं आहे असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.