Sonam Kapoor : love every moment म्हणत आनंद आहुजाने शेअर सोनम कपूरचे खास फोटो
यापूर्वीही आनंद आहुजाने सोनमच्या वाढदिवसालाही खास पोस्ट लिहीत तिला वाढ दिवसांचा शुभेच्छा दिल्या होत्या. सोनमच्या बेबीशॉवरला अमेरिकन सिंगर लिओ कल्याण आपल्या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले होते .
1 / 5
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर- आहुजा लवकरच आई होणार आहे. ती सध्या पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे. सोनम व आनंद आहुजा आपल्या मातृत्वाच्या या प्रवासाचा आनंद घेत आहेत. अनेकदा ते आपले आनंदी क्षण चाहत्यांच्यासोबतही शेअर करत असतात.
2 / 5
आंनद आहुजाने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर सोनमचे नॉनफिल्टर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटो सोनमच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा ग्लो दिसून येत आहे.
3 / 5
love every moment असं कॅप्शन देत आनंद आहुजाने हे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी आनंदने अनेकदा सोनमचा मातृत्वाच्या काळातील फोटो पोस्ट करत सोनमचे कौतुक केले आहे .
4 / 5
लंडनमध्ये सोनम कपूरचा बेबीशॉवरचा कार्यक्रम संपन्न झाला. या दिमाखदार कार्यक्रमात सोनम कपूरची बहीण रुही कपूरही उपस्थित होती.
5 / 5
यापूर्वीही आनंद आहुजाने सोनमच्या वाढदिवसालाही खास पोस्ट लिहीत तिला वाढ दिवसांचा शुभेच्छा दिल्या होत्या. सोनमच्या बेबीशॉवरला अमेरिकन सिंगर लिओ कल्याण आपल्या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले होते .