PHOTO : जसप्रीत बुमराहकडून पत्नी संजना गणेशनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर, म्हणाला…
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मागील महिन्यात क्रिकेट प्रेजेंटर संजना गणेशन सोबत लग्न केलंय.

संजना गणेशनने रिसेप्शनचे फोटो शेअर करताना लिहिलं, 'मागील काही दिवसांमध्ये तुमच्याकडून ओसंडून वाहणाऱ्या प्रेमासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही खूप मोठ्या हास्यासह तुमचे हे सदिच्छा संदेश वाचत आहोत. धन्यवाद.'
- भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मागील महिन्यात क्रिकेट प्रेजेंटर संजना गणेशन सोबत लग्न केलंय. यानंतर त्याचे चाहते सातत्याने त्याचं अभिनंदन करताना दिसत आहेत. अनेकांना त्याच्या या खासगी प्रवासाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. हेच ओळखून बुमराहने देखील संजनासोबतचे आपले काही खास फोटो शेअर केलेत.
- जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नानंतर आपल्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रांना दिलेल्या रिसेप्शनचे फोटो शेअर केलेत. तसेच चाहत्यांच्या सदिच्छांसाठी त्यांचे आभारही मानलेत. बुमराह म्हणाला, ‘मागील काही दिवस जादुपेक्षा कमी नव्हते. तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रेमासाठी आम्ही आभार मानतो, धन्यवाद.’
- संजना गणेशनने रिसेप्शनचे फोटो शेअर करताना लिहिलं, ‘मागील काही दिवसांमध्ये तुमच्याकडून ओसंडून वाहणाऱ्या प्रेमासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही खूप मोठ्या हास्यासह तुमचे हे सदिच्छा संदेश वाचत आहोत. धन्यवाद.’
- संजना गणेशनने आयपीएलच्या काळात केकेआर डायरीज नावाचा एक शो होस्ट केला आहे. तिने 2016 मध्ये केकेआरसोबत काम करण्यास सुरुवात केली. नाईट क्लब नावाच्या शोचंही होस्टिंग तिने केलं होतं. संजना गणेशनने आयसीसी वर्ल्ड कप 2019 देखील कव्हर केलाय.
- संजना गणेशन आणि जसप्रीत बुमराह 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकपच्या काळात एकमेकांना डेट करत होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या मेहंदीत वर्ल्ड कपचं डिझाईन तयार केलं होतं. दोघांनी खूप काळापासून आपल्या नात्याविषयी गुप्तता पाळली होती.