‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.
या दोघांचा लग्न सोहळा अतिशय उत्साहात आणि शाही पद्धतीनं पार पडला. आता गौहर आणि जैद त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
सोबतच आता या दोघांनी खास फोटोशूटही केलंय. या फोटोमध्ये दोघंही नाईट सूटमध्ये आहेत.
'Hubby'आणि 'Wifey'असं या टी-शर्टवर लिहिलेलं आहे. या फोटोंमध्ये दोघंही अतिशय आनंदी दिसत आहेत.
या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अजूनही ट्रेंडिग आहेत. यामुळे आता गौहर आणि जैदचं हे फोटोशूट कपल गेल्स देणारं ठरतंय.