सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्तानं ही माहिती दिली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आता तिच्या शुटिंग लोकेशनवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'मोगऱ्यासोबत पारिजातक ?शिवनेरीच्या पायथ्याशी ?' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
सोबतच तिनं एक लोकेशनचा सुंदर व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सूर्यनमस्कार घालताना दिसत आहे.
'शिवनेरी पायथा.. ७५ वर्ष जूनी शाळा..खूप ॲाक्सिजन, सूर्यप्रकाश.. आणि माझे प्रिय सूर्यनमस्कार...' असं कॅप्शन देत तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.