IND vs AFG : विराट कोहलीने अशा पद्धतीने खेळणं पडेल महागात! माजी क्रिकेटपटूचा इशारा
टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने पुनरागमन केलं आहे. 14 महिन्यांच्या कालावधीनंतर विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला. त्यानंतर विराट कोहली आयपीएल खेळेल. पण विराट कोहलीने पहिल्याच टी20 सामन्यातून फलंदाजीचं झलक दाखवली आहे. त्याची नवी शैली पाहून माजी क्रिकेटपटूने भीती व्यक्त केली आहे.
1 / 6
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली टी20 फॉरमॅटमध्ये 14 महिन्यांच्या कालावधीनंतर परतला आहे. 2022 च्या टी20 विश्वचषकानंतर विराट कोहली टी20 सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. टी20 पुनरागमन करत विराट कोहलीने एक मोठा बदल केला. त्याच्या फलंदाजीत याची छाप दिसून आली.
2 / 6
विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात केवळ 16 चेंडूत 29 धावा केल्या. त्याने 180 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्यामुळे विराट कोहलीच्या आक्रमक पवित्र्याची चर्चा होत आहे.
3 / 6
या मालिकेपूर्वी विराट कोहलीचा स्ट्राईक रेट खूपच खराब असल्याच दिसून आलं आहे.टी20 नव्या पद्धतीत योग्य बसत नाही. त्यामुळे विराट कोहली अस्वस्थ असावा असं जाणवत आहे. त्यामुळे विराट कोहलीने या मालिकेतून आपलं आक्रमक रूप दाखवलं आहे.
4 / 6
विराट कोहलीचा बदललेल्या अंदाजाबाबत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने चिंता व्यक्त केली आहे. विराट कोहलीला फार काही बदलण्याची गरज नाही. विराट कोहली आधीच टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 4 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. विराटचा स्ट्राइक रेट 140 आहे.
5 / 6
आकाश चोप्राने सांगितलं की, विराट कोहलीने फलंदाजीत बदल केल्यास सातत्याने धावा करणे कठीण जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे सीनियर खेळाडू टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग असतील, हे जवळपास निश्चित झालं आहे.
6 / 6
भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळत आहे. भारताने ही मालिका 2-0 ने आधीच जिंकली आहे. आता तिसरा सामना केवळ औपचारिकता असणार आहे. तर या मालिकेतूनच टी20 वर्ल्डकपची पायाभरणी सुरु झाली आहे.