आर अश्विनची कानपूर कसोटीत ऐतिहासिक कामगिरी, मुरलीधरनच्या बरोबरीत मिळालं स्थान

आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एक एक अनेक विक्रमांना गवसणी घातली. आता आणखी एक विक्रम त्याच्या रडारवर असून श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या पंगतीत बसला आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका संपताच त्याला हा मान मिळाला आहे. कदाचित न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पुढे जाण्याची शक्यता आहे.

| Updated on: Oct 01, 2024 | 3:53 PM
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानात पार पडला. पाऊस गेल्यानंतर भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांचं वादळ क्रीडाप्रेमींना अनुभवता आलं. चौथ्या दिवशी भारताने खऱ्या अर्थाने बांगलादेशचं कंबरडं मोडलं. तसेच पाचव्या दिवशी लंचनंतर विजय मिळवला. भारताने मालिका 2-0 ने खिशात घातली.

1 / 5
आर अश्विनने या मालिकेत दुहेरी भूमिका बजावली. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी आणि विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजीत कमाल केली. पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 3 गडी बाद केले. या कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

2 / 5
मालिकावीराचा पुरस्कार मिळताच आर अश्विनच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुथय्या मुरलीधरनसह पंगतीत बसला आहे. आर अश्विनला मालिकावीराचा पुरस्कार मिळण्याची ही 11वी वेळ आहे. मुथय्या मुरलीधरन यालाही 11 वेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे.

3 / 5
आर अश्विनने 39 कसोटी सामन्यात 11 वेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळवला आहे. तर मुथय्या मुरलीधरने 60 मालिका खेळल्यानंतर 11 वेळा हा पुरस्कार मिळवला होता. जॅक कॅलिस, शेन वॉर्न, इम्रान खान आणि रिचर्ड हॅडली यांनी प्रत्येकी 8 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे.

4 / 5
भारताचा पुढची कसोटी मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आर अश्विनच्या कामगिरीकडे लक्ष लागून असेल. जर या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार मिळाला तर अव्वल स्थानी विराजमान होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.