Asia Cup 2023 : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने विराट कोहली याचा विक्रम मोडला, नेमंक काय केलं ते वाचा
Asia Cup 2023 : आशिया कप 2023 स्पर्धेत पाकिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. बाबर आझम आपल्या फलंदाजीने नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 22 चेंडूत 17 धावा केल्या आणि विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला.
1 / 7
आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानची विजयी घोडदौड सुरुच आहे. सुपर 4 फेरीतील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. विजयासह दोन गुणांची कमाई केली आहे आणि नेट रनरेट +1.051 इतका आहे.
2 / 7
नेपाळ विरुद्धच्या सामन्यात दीड शतकी खेळी करणारा बाबर आझम बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात काही खास करू शकला नाही. 22 चेंडूत 17 धावा करून बाद झाला.मात्र त्याने विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला.
3 / 7
वनडे रँकिंगमध्ये बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. टी20 रँकिंगमध्ये बाबर आझम तिसऱ्या स्थानी आहे. तर कसोटीत बाबर आझम चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, बाबरच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत पाकिस्तानचा संघ वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
4 / 7
पाकिस्तानने आशिया कप 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामन्यात नेपाळचा 238 धावांनी धुव्वा उडवला होता. या सामन्यात बाबर आझमने 151 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारत विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीच आली नाही. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 22 चेंडूत 17 धावा केल्या आणि कर्णधार म्हणून वनडे इतिहासात 2000 धावा पूर्ण केल्याचा विक्रम केला आहे.
5 / 7
कर्णधार पदावर विराजमान झाल्यानंतर हा टप्पा गाठण्यासाठी बाबर आझम याला 31 सामने खेळावे लागले. तर विराट कोहली याने हा टप्पा 36 सामन्यात गाठला होता.
6 / 7
बाबर आझम याने 31 मे 2015 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधून पदार्पण केलं होतं. 106 वनडे सामन्यात त्याने 19 शतकं झळकावली आहेत. तसेच पाकिस्तानसाठी सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
7 / 7
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्वर याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 20 शतकांचा विक्रम आहे. या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी बाबर आझम याला आणखी एका शतकाची गरज आहे.