IND vs BAN : रोहित शर्मा याच्या नावावर नकोसा विक्रम, 25 वर्षानंतर भारतीय कर्णधाराची वाईट कामगिरी

| Updated on: Sep 15, 2023 | 11:27 PM

Rohit Sharma: रोहित शर्मा आशिया कपच्या सुपर 4 फेरीत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला आणि सर्वात वाईट विक्रमाची नोंद केली.

1 / 6
आशिया कप स्पर्धेत सुपर 4 फेरीत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्याने फक्त दोन चेंडू खेळले आणि सिल्वर डकवर आऊट झाला

2 / 6
आशिया कप स्पर्धेत त्याने सलग तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध चांगील खेळी केली. पण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला.

3 / 6
बांगलादेश विरुद्ध शून्यावर बाद झाला आणि नकोसा विक्रम प्रस्थापित केला. आशिया कप स्पर्धेत तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या दोन-दोन वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

4 / 6
आशिया कप इतिहासात दुसऱ्यांदा एखादा कर्णधार शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी 1988 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कर्णधार दिलीप वेंगसरकर 2 चेंडू खेळत शून्यावर बाद झाला होता. आता 25 वर्षानंतर रोहित शर्मा बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 2 चेंडू खेळत शून्यावर बाद झाला.

5 / 6
आशिया कप स्पर्धेत पाच बदल करणं महागात पडलं असंच म्हणावं लागेल. कारण बांगलादेशनं भारताचा धावांनी पराभव केला. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये असे बदल प्रभावी ठरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

6 / 6
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने 50 षटकात 8 गडी गमवून 265 धावा केल्या. पण भारताचा संघ सर्वबाद 259 धावा करू शकला. भारताचा 6 धावांनी पराभव झाला.