टीम इंडिया श्रीलंका टीमवर 10 विकेट्सने विजय मिळवत आशिया कप 2023 वर आपलं नावं कोरलं. टीम इंडियाने 51 धावांचं आव्हान हे अवघ्या 15.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरलाय.
टीम इंडियाने यासह आपलाच 22 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. याआधी टीम इंडियाने केन्या विरुद्ध ही कामगिरी केली होती.
टीम इंडियाचा श्रीलंका विरुद्ध सर्वात जास्त बॉल शिल्लक ठेवून मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरलाय. टीम इंडियाने श्रीलंकावर 263 बॉल शेष ठेवून ही कामगिरी केलीय.
टीम इंडियाने 2001 साली केन्या विरुद्ध विजय मिळवला होता. तेव्हा टीम इंडियाने 231 बॉलआधीच केन्यावर मात केली होती.
तर टीम इंडियाने 2018 साली वेस्ट इंडिज विरुद्ध 211 बॉल शिल्लक ठेवून विजय मिळवला होता. टीम इंडियाचा हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे.