IND vs SL: रोहित शर्मा याने गाठला आणखी एक मैलाचा दगड, अशी कामगिरी करणारा नववा भारतीय खेळाडू

| Updated on: Sep 17, 2023 | 4:25 PM

IND vs SL, Asia Cup 2023: आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल होताच भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

1 / 6
आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी हा अंतिम फेरीचा सामना खास आहे. कारण या सामन्याचा टॉस होताच एक रेकॉर्ड नोंदवला आहे.

2 / 6
रोहित शर्मा वनडे कारकिर्दीतील 250 वा क्रिकेट सामना खेळत आहे. रोहित शर्मा 250 वनडे खेळणारा नवावा भारतीय खेळाडू आहे.

3 / 6
रोहित शर्मा याच्या आधी सचिन तेंडुलकर (463), एमएस धोनी (347), राहुल द्रविड (340), मोहम्मद अझरुद्दीन (334), सौरव गांगुली (297), युवराज सिंह (275), विराट कोहली (280*) आणि अनिल कुंबले (271) यांनी इतके वनडे सामने खेळले आहेत.

4 / 6
रोहित शर्मा याने आतापर्यंत खेळलेल्या 249 सामन्याती 242 डावात 48.69 च्या सरासरीने 10031 धावा केल्या आहेत. वनडे करियरमध्ये रोहित शर्मा याने 30 शतक आणि 51 अर्धशतकं ठोकली आहेत.

5 / 6
वनडे फॉर्मेटमधये रोहित शर्मा याच्या नावावर 264 धावा आहे. वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर आहे. रोहित शर्मा याने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.

6 / 6
रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये 3 वेळा द्विशतक ठोकले आहेत. अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. आशिया कप अंति फेरीचा सामना जिंकला तर कर्णधारपदाच्या कारकिर्दीत दुसरा आणि भारताचं आठवं जेतेपद असेल.