आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत अनेक थरारक आणि रंगतदार सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यांचाही समावेश आहे. या स्पर्धेतील आतापर्यंतच्या 5 सामन्यांच्या अजबगजब निकालांबाबत आपण जाणून घेणार आहेत.
आशिया कप 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 5 सामन्याच्या आश्चर्यकारक निकालाबाबत माहिती घेणार आहोत.
बांगलादेश टीम 2018 मध्ये आशिया कप स्पर्धेत उपविजेता ठरली होती. बांगलादेशने तेव्हा श्रीलंकेला 137 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली होती. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका पराभूत होईल, असा कुणी विचारही केला नसेल. मात्र श्रीलंकेचा डाव हा 262 धावांचा पाठलाग करताना 124 धावांवर आटोपला होता.
बांगलादेशकडून सपाटून मार खाल्लानंतर श्रीलंकेला 2018 मध्ये अफगाणिस्तानने पराभूत केलं होतं. आरपारच्या सामन्यात अफगाणिस्तानने 249 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र श्रीलंकेचा बाजार 158 धावांवर आटोपला होता. अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करत क्रिकेट विश्वात विक्रम रचला होता.
बांगलादेशने त्यानंतर सुपर 4 धडक मारली. बांगलादेशसमोर पाकिस्तानचं आव्हान होतं. दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा सामना होता. मात्र इथंही बांगलादेशने पाकिस्तानचा टांगा पलटी केला. बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान 202 धावांवर ढेर झाली.
बांगलादेशने 2012 आशिया कपमध्येही चमकदार कामगिरी करत पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक मारली होती. बांगलादेशने साखळी फेरीत श्रीलंका विरुद्ध 212 रन्सचं टार्गेट हे 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि विजय मिळवला. श्रीलंकेला लाजीरवाण्या पराभवाचा 'सामना' करावा लागला होता.
बांगलादेशने 2012 मध्ये श्रीलंकाच नाही, तर टीम इंडियालाही पराभवाची धुळ चारली होती. सचिन तेंडुलकर याने याच सामन्यात शतकांचं शतक पूर्ण केलं होतं. टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 290 रन्सचं टार्गेट बांगलादेशने 5 विकेट्स राखून पूर्ण केलं.