Asia Cup 2023 : आयसीसी रँकिंगमध्ये शुबमन गिल, रोहित शर्मा यांना जबरदस्त फायदा, पाकिस्तानने गमवालं पहिलं स्थान
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या चमकदार कामगिरीमुळे आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना फायदा झाला आहे. तर पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे.
1 / 7
वनडे वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाची आशिया कप स्पर्धेत कसोटी लागली आहे. भारताने अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली आहे. तसेच अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आयसीसी रँकिंगमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर
2 / 7
वनडे फलंदाजीच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम 863 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर नेपाळ आणि पाकिस्तान विरुद्ध जबरदस्त कामगिरी करणारा शुभमन गिल 759 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली 715 गुणांसह आठव्या आणि रोहित शर्मा याने टॉप 10 मध्ये एन्ट्री मारत 707 गुणांसह नववं स्थान गाठलं आहे.
3 / 7
केएल राहुल याच्या क्रमावारीतही तीन अंकांची सुधारणा झाली आहे. दुखापतीमुळे केएल राहुल मैदानापासून दूर होता. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत चांगला फायदा झाला आहे. 40 व्या स्थानावरून थेट 37 व्या स्थानी झेप घेतली आहे.
4 / 7
वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या दोन गोलंदाजांचा समावेश आहे. फिरकीपटू कुलदीप यादव याला जबरदस्त फायदा झाला आहे. 656 गुणांसह कुलदीप यादव सातव्या स्थानावर आहे. 643 गुणांसह मोहम्मद सिराज नवव्या स्थानी आहे.
5 / 7
जसप्रीत बुमराह याच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. 29 व्या स्थानावरून थेट 27 स्थानावर झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराह गेल्या वर्षभरापासून दुखापतीमुळे मैदानात उतरला नव्हता. आता पुन्हा त्याला सूर गवसताना दिसत आहे.
6 / 7
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा एकमेव हार्दिक पांड्या आहे. 237 गुणआंसह हार्दिक पांड्या सहाव्या स्थानावर आहे. या पलीकडे पहिल्या 20 स्थानात एकाही भारतीयाचा समावेश नाही.
7 / 7
पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना 233 धावांनी गमावल्याने रँकिंगमध्ये जबर फटका बसला आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. ऑस्ट्रेलिया रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर पुन्हा अव्वल स्थान गाठता येईल. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे.