Asia Cup 2023 : रोहित शर्मा याने मोडला शाहीद आफ्रिदीचा महारेकॉर्ड, काय केलं ते वाचा
Rohit Sharma : भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी करताना दोन षटकार मारले आणि विक्रम आपल्या नावावर केला.
1 / 6
भारतीय क्रिकेट संघाचा ओपनर रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध 48 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. यावेळी त्याने पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला.
2 / 6
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीच्या नावावर होता.
3 / 6
रोहित शर्मा याने 25 डावात 28 षटकार ठोकले आहेत. तर शाहीद आफ्रिदीने 21 डावात 26 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर श्रीलंकेच्या दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्या याचा नंबर लागतो.
4 / 6
रोहित शर्मा 28, शाहिद आफ्रिदी 26, सनथ जयसूर्या 23, सुरेश रैना 18 आणि मोहम्मद नबीने 13 षटकार मारले आहेत.
5 / 6
रोहित शर्मा याने श्रीलंका विरोधात 22 धावा करतात 10 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. रोहित शर्मा याने 248 सामन्यात 10031 धावा केल्या आहेत.
6 / 6
रोहित शर्मा याने आशिया कप स्पर्देत सलग तिसरं अर्धशतक झळकावलं आहे. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा याच्या नावावर 30 शतकं आणि 51 अर्धशतकं आहेत.