टीम इंडियाने बांगलादेश विरुद्धच्या सुपर 4 मधील अखेरच्या सामन्यत बेंचवरील अनेक खेळाडूंना संधी देत प्लेईंग ईलेव्हनमध्ये 5 बदल केले आहेत. यामध्ये एका खेळाडूला वनडे पदार्पणाची संधी दिली आहे.
टीम मॅनेजमेंटने तिलक वर्मा या युवा आणि डॅशिंग खेळाडूला वनडे डेब्यूची संधी दिली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने तिलक वर्मा याला टीम इंडियाची कॅप दिली.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचे सर्व खेळाडू एकत्र जमले. तेव्हा रोहितने तिलकचं कॅप देत वनडे टीम इंडियात स्वागत केलं. त्यावेळेस इतर सर्व खेळाडूंनी तिलकचं अभिनंदन केलं.
तिलकने याआधी नुकत्याच पार पडलेल्या विंडिज दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तिलकने 3 ऑगस्ट रोजी वेस्टइंडिज विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत तिलकने 7 टी 20 सामन्यात 1 अर्धशतकासह 174 धावा केल्या आहेत.
तसेच बांगलादेशकडून युवा खेळाडूनेही वनडे डेब्यू केलंय. बांगलादेशन टीमकडून तांझिम हसन साकिब याने एकदिवसीय पदार्पण केलंय.