Team India : वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची आशिया चषकात लिटमस टेस्ट, कोणत्या खेळाडूंची कशी आहे कारकिर्द ते जाणून घ्या
Asia Cup 2023 Team India : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची कसोटी लागणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह याच्यास श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. चला जाणून घेऊयात या खेळाडूंची आतापर्यंतची वनडे क्रिकेट कारकिर्द
1 / 19
रोहित शर्माकडे टीम इंडियाची धुरा असून त्याची वनडे क्रिकेट कारकिर्द जबरदस्त राहिली आहे. रोहित शर्मा याचं वय 36 असून त्याने आतापर्यंत 244 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 9837 धावा केल्या आहेत. 30 शतकं आणि 48 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने 3 द्विशतकं मारली आहेत.
2 / 19
शुबमन गिल याचीही वनडे स्क्वॉडमध्ये नियुक्ती झाली आहे. शुबमन गिल याने 27 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 1437 धावा केल्या आहेत. यात चार शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्याने एक द्विशतक ठोकलं आहे.
3 / 19
विराट कोहली याने 275 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 46 शतकं आणि 65 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने वनडे क्रिकेट कारकिर्दीत 12898 धावा केल्या आहेत.
4 / 19
श्रेयस अय्यर याचं दुखापतीनंतर कमबॅक झालं आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटणार आहे. वनडे कारकिर्दीत त्याने 42 सामने खेळले असून 1631 धावा केल्या आहेत. 2 शतकं आणि 14 अर्धशतकं ठोकली आहेत.
5 / 19
सूर्यकुमार यादव याची वनडे क्रिकेट कारकिर्द हवी तशी चांगली राहिली नाही. या बाबत त्याने स्वत: कबुली दिली आहे. त्याने 26 वनडे सामने खेळले आहे. यात फक्त त्याने दोन अर्धशतकं ठोकली आहेत. तर 26 सामन्यात त्याने 511 धावा केल्या आहेत.
6 / 19
तिलक वर्मा याची वनडे क्रिकेट संघात निवड झाली आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय वनडेत खेळण्याचा त्याला अनुभव नाही. त्यामुळे आशिया चषकात त्याची कामगिरी कशी राहते यावर त्याचं वनडे वर्ल्डकपमधील भवितव्य ठरणार आहे. आयर्लंड विरुद्धच्या दोन टी20 सामन्यात त्याची कामगिरी हवी तशी राहिली नाही.
7 / 19
केएल राहुल हा दुखापतीतून बरा होऊन पुन्हा एकदा संघात परतला आहे. त्याने आतापर्यंत 54 वनडे सामने खेळले असून एकूण 1986 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 शतकं आणि 13 अर्धशतकं ठोकली आहेत.
8 / 19
ईशान किशन याचीही वनडे संघात वर्णी लागली आहे. त्याने आतापर्यंत 17 वनडे सामने खेळला असून त्याने 694 धावा केल्या आहे. यात त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतक ठोकली आहेत. यात द्विशतकाचं समावेश आहे.
9 / 19
हार्दिक पांड्या टीम इंडियातील महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. हार्दिकने 77 वनडे सामने खेळले असून त्यात त्याने 1666 धावा केल्या आहेत. यात 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत 73 गडी बाद केले आहे.
10 / 19
रवींद्र जडेजा हे भारतीय संघातील प्रमुख अस्र आहे. बॅट आणि बॉल दोन्हीत त्याची कामगिरी एकदम खास राहिली आहे. रवींद्र जडेजा याने 177 वनडे सामने खेळले असून 2560 धावा केल्या आहेत. यात 13 अर्धशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत 194 विकेट्स घेतल्या आहेत.
11 / 19
शार्दुल ठाकुर वेगवान गोलंदाजीच्या भात्यातील प्रमुख अस्र आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्याने 38 वनडे साम्यात 58 गडी बाद केले आहेत. तर फलंदाजीत चांगला असून त्याने एका अर्धशतकासह 315 धावा केल्या आहेत.
12 / 19
अक्षर पटेल हा सुद्धा अष्टपैलू खेळाडूंपैकी आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. मोक्याची क्षणी टीम इंडियाला तारण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने 52 वनडेत त्याने 58 गडी बाद केले आहेत. तर फलंदाजीत 413 धावा केल्या असून 2 अर्धशतकं ठोकली आहेत.
13 / 19
कुलदीप यादव हा फिरकीचा जादूगर आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कुलदीप यादव याने 84 सामने खेळले असून 141 गडी बाद केले आहेत. तसेच 164 धावा केल्या आहेत.
14 / 19
जसप्रीत बुमराह याच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजी बाजू भक्कम झाली आहे. 72 वनडेत त्याने 121 गडी बाद केले आहेत. 19 धावा देऊन 6 गडी बाद करण्याचा सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आहे.
15 / 19
मोहम्मद शमी याने 90 सामने खेळले असून 162 विकेट्स टिपले आहेत. 69 धावा देत 5 गडी बाद करण्याचा सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आहे. फलंदाजीत त्याने 204 धावा केल्या आहेत.
16 / 19
17 / 19
प्रसिद्ध कृष्णा याने 14 वनडे सामने खेळला आहे. यात त्याने 25 गडी बाद केले आहेत. 12 धावा देऊन 4 गडी बाद ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी आहे.
18 / 19
संजू सॅमसन याची राखीव विकेटकीपर म्हणून निवड करण्यात आली आहे. 13 सामन्यात त्याने 390 धावा केल्या आहेत. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
19 / 19
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. राखीव खेळाडू | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)